मुंबई : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू आणि त्याच्या चाहत्यांसाठी वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात निराशाजनक बातमी आहे. मेस्सीला करोनाची लागण झाली आहे. त्याच्याशिवाय पॅरिस सेंट जर्मेन () चे इतर ३ खेळाडू देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. स्वत: पीएसजी क्लबने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ही बातमी येताच सोशल मीडियावरही एकच गोंधळ उडाला आहे. अनेक फुटबॉल प्रेमी त्यांच्या नायकांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. मेस्सी सध्या पीएसजी क्लबशी संबंधित आहे. अलीकडील काही दिवसांत क्रीडाविश्वातील अनेक खेळाडू कोरोनाच्या कचाट्यात सापडू लागले आहेत. मेस्सीशिवाय क्लबच्या आणखी तीन खेळाडूंना संसर्ग झाला आहे. क्लबने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, सर्व खेळाडूंना आयसोलेट करण्यात आले आहे आणि ते सध्या कोरोना प्रोटोकॉलचे पालन करत आहेत. पीएसजीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, संघातील एका कर्मचाऱ्यालाही संसर्ग झाल्याचे आढळले आहे. क्लबने खेळाडूंची नावे उघड केली नाहीत, पण वैद्यकीय पथकाने नंतर त्यांच्या निवेदनात सांगितले की, व्यतिरिक्त लेफ्ट-बॅक हुआ बर्नेट, बॅकअप गोलकीपर सर्जियो रिको आणि १९ वर्षीय मिडफिल्डर नॅथन बिटुमझाला यांना संसर्ग झाल्याचे आढळले आहे. याआधी मोनॅको टीममध्येही कोरोनाची सात प्रकरणे नोंदवली गेली होती, पण त्यांच्यापैकी एकाही व्यक्तीमध्ये कोणतीही गंभीर लक्षणे दिसून आली नाहीत.
from Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times https://ift.tt/3pNVzM2
https://ift.tt/3EQnJKm
0 Comments