name plate

name plate

पंतप्रधान मोदींचे महत्त्वाचे विधान; 'भेदभावाला थारा न देणारी यंत्रणाच...'

नवी दिल्ली: ‘ सामाजिक न्याय आणि समतेच्या पायावर भक्कमपणे उभा आहे अशा समाजाची बांधणी आम्ही करत आहोत. नावीन्यपूर्ण आणि प्रगतीची दृष्टी असलेला हा नवा भारत आहे. येथे कुठल्याही प्रकारच्या भेदभावाला थारा नसेल, अशी यंत्रणा विकसित केली जात आहे,’ असे प्रतिपादन यांनी केले आहे. ‘आझादी के अमृत महोत्सव से स्वर्णिम भारत की ओर’ या राष्ट्रीय अभियानाचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रारंभ केल्यानंतर पंतप्रधान बोलत होते. ( ) वाचा : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘ब्रह्मकुमारीज्’तर्फे वर्षभर कार्यक्रम राबविले जाणार आहेत. त्यात ३० अभियान, १५,००० कार्यक्रमांचा समावेश असेल. लोकसभेचे सभापती , राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा, राजस्थानचे मुख्यमंत्री , गुजरातचे मुख्यमंत्री आदी या सोहळ्यास ऑनलाइन सहभागी झाले होते. यावेळी मोदी पुढे म्हणाले की, प्रत्येकाने व्यक्तिगत कर्तव्याचे भान ठेवत देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करावेत. आगामी २५ वर्षांत प्रत्येक नागरिकाने देशाच्या उभारणीसाठी उपक्रम राबवावेत. वाचा : प्रतिमा मलीन करण्याचे प्रयत्न रोखावेत ‘आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिमा मलीन करण्याचे प्रयत्न काही समाजकंटक करीत असतात, त्याकडे स्वातंत्र्यानंतर दुर्लक्ष केले गेले. आता तसे होऊ नये तर, ब्रह्मकुमारीजसारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापक जाळे असणाऱ्या संस्थांनी जाणीवपूर्वक देशाबद्दलची सत्य माहिती, चांगल्या बाबी, संस्कार, सामर्थ्य जगभर पोहोचविण्याची गरज आहे,’ असे मतही यांनी कार्यक्रमात व्यक्त केले. वाचा : गेहलोत यांनी मोदींसमोरच व्यक्त केली चिंता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या कार्यक्रमात मोदींसमोरच देशातील सद्यस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. देशातील वातावरण गढूळ झाले आहे. हिंसाचार वाढत चालला आहे. एकप्रकारची तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. यातून देशाला मुक्तता मिळायला हवी. बंधुभाव आणि शांतता सर्वत्र नांदायला हवी तरच आपला देश विकासाच्या मार्गावर पुढे जाईल, असे गेहलोत म्हणाले. वाचा :


from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3GO6QBY
https://ift.tt/3AieAcU

Post a Comment

0 Comments