नवी दिल्ली: देशात सुरू झाले आहे. यात १५ ते १८ वयोगटातील मुलांना ही लस देण्यास अनुमती देण्यात आली आहे. याबाबत गंभीर स्वरूपाची माहिती प्राप्त झाल्यानंतर भारत बायोटेकने त्याची तातडीने दखल घेतली असून आरोग्य कर्मचाऱ्याना महत्त्वाचे आवाहन केले आहे. ( ) वाचा : भारतात लहान मुलांसाठी सध्या केवळ कोव्हॅक्सिन लसलाच मान्यता देण्यात आलेली आहे. अन्य कोणत्याही लसला औषध महानियंत्रकांची मंजुरी मिळालेली नाही. असे असताना सध्या सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत मुलांना कोविडवरील इतर लसही देण्यात येत असल्याची बाब कंपनीच्या निदर्शनास आली आहे. त्यावरच बोट ठेवत कंपनीने आज एक पत्रक जारी करत आरोग्य कर्मचाऱ्यांना महत्त्वाचं आणि तातडीचं आवाहन केलं आहे. वाचा : भारत बायोटेकने काय म्हटलं? 'सरकारकडून मंजुरी मिळालेली नाही, अशा लस पंधरा ते अठरा वर्षांच्या मुलांना देण्यात येत आहेत. असे प्रकार अनेक ठिकाणी घडले आहेत. याबाबत आमच्याकडे रिपोर्ट्स आले असून ही बाब गंभीर आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणाबाबत अधिक सतर्कता बाळगायला हवी, अशी आमची कळकळीची विनंती आहे. १५ ते १८ वर्षे वयोगटाच्या मुलांना कोव्हॅक्सिन लसच दिली जात आहे याची खातरजमा करा. त्यावर लक्षही ठेवा', असे आवाहन या पत्रकाच्या माध्यमातून भारत बायोटेक कंपनीने केले आहे. कोव्हॅक्सिनला अनेक क्लिनिकल ट्रायलनंतर मंजुरी मिळालेली आहे. २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांवर अनेक चाचण्या घेण्यात आल्या. त्यातून कोव्हॅक्सिन ही लस मुलांसाठी अधिक सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले व ही बाब लक्षात घेऊन लसच्या वापरास मंजुरी मिळाली आहे. सध्यातरी अशी मंजुरी अन्य कोणत्याही लसला भारतात मिळालेली नाही. ही बाबही ध्यानात घ्यावी, असे आवाहन कंपनीने केले आहे. महामारीच्या काळात आपल्या आरोग्याची पर्वा न करता अविरत सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे कंपनीने विशेष कौतुकही केले. वाचा :
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3Ad6nGN
https://ift.tt/3Knktdt
0 Comments