नवी दिल्ली: सीमेवर नेहमीच कुरापती करणाऱ्या चिनी सैन्याने ( ) भारतीय हद्दीत घुसखोरी करून धक्कादायक कृत्य केले आहे. चिनी सैनिकांनी अरुणाचल प्रदेशमधील एका १७ वर्षीय मुलाचे अपहरण केले असून या मुलाच्या सुखरूप सुटकेसाठी भाजप खासदाराने केंद्राकडे विनंती केली आहे. ( ) वाचा: भाजपचे अरुणाचल पूर्वचे खासदार यांनी ट्वीटरच्या माध्यमातून या खळबळजनक घटनेबाबत माहिती दिली आहे. १८ जानेवारी रोजी भारतीय हद्दीतून नावाच्या मुलाचे चिनी सैन्याने अपहरण केले असून या घटनेकडे गाओ यांनी केंद्राचे लक्ष वेधले आहे. वाचा: तापीर गाओ यांनी नेमकी माहिती आपल्या ट्वीटमध्ये दिली आहे. '१८ जानेवारी रोजी चिनी सैन्याने अरुणाचलमध्ये भारतीय हद्दीत घुसखोरी केली. सीमेवरील अप्पर सियांग जिल्ह्यात लुंगता जोर (चीनने येथे भारतीय हद्दीच्या आत तीन ते चार किलोमीटरचा रस्ता बनवला आहे) येथून त्यांनी मीरम तरोन आणि त्याचा मित्र यांचे अपहरण केले. हे दोघेही झिडो गावातील राहणारे आहेत. यापैकी मीरमचा दोस्त चिनी सैन्याच्या तावडीतून निसटला आहे मात्र मीरमचा कोणताच पत्ता लागलेला नाही', असे नमूद करत गाओ यांनी भीती व्यक्त केली आहे. मीरमच्या मित्रानेच संपूर्ण घटनाक्रम भारतीय लष्कराला सांगितला असून मीरमच्या सुटकेसाठी केंद्र सरकारच्या सर्व संबधित यंत्रणांनी तातडीने पावले उचलावीत, अशी विनंती गाओ यांनी केली आहे. गाओ यांनी आपल्या ट्वीटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री यांना टॅग केले आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक यांनाही गाओ यांनी या घटनेबाबत माहिती दिली आहे. वाचा : दरम्यान, सप्टेंबर २०२० मध्ये चिनी सैन्याने अशाचप्रकारे अप्पर सुबानसीरी जिल्ह्यातून पाच तरुणांचे अपहरण केले होते. त्यानंतर आठवड्याने या सर्वांची सुटका करण्यात आली होती. पूर्व लडाखमध्ये भारतीय लष्कर आणि चिनी सैन्यात सातत्याने तणावाची स्थिती आहे. अशावेळी चिनी सैन्याची ही कुरापत तणावात भर घालणारी ठरली आहे. वाचा:
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3nIPIWH
https://ift.tt/34VM9py
0 Comments