name plate

name plate

MP dr shrikant Shinde: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा रेल्वे प्रशासनाला इशारा, म्हणाले...

: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला रेल्वे रूळाजवळील घरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या झोपडपट्टी धारकांना यांनी भेट दिली. यावेळी या झोपडपट्टी धारकांच्या बाजूने ठाम पणे उभे असून वेळ पडल्यास नागरिकांच्या आधी आम्ही विरोध करू असा इशारा यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाला दिला आहे. रेल्वे प्रशासनाने सरकारी जमिनींवर उभ्या असलेल्या झोपडपट्टी धारकांना ७ दिवसाच्या आत घर खाली करण्यासाठी नोटीस बजावल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हि लोक या ठिकाणी वास्तव्य करत आहेत तेव्हा रेल्वे प्रशासनाला जाग नाही आली मात्र जेव्हा सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले तेव्हा रेल्वे प्रशासनाला आठवण झाल्याचा आरोप देखील यावेळी खासदारांनी केला आहे. तुम्हाला जाग हवी असेल तर त्याचं योग्य ते पुनर्वसन करा अशी मागणी देखील खासदारांनी केली आहे. (we stand firmly on the side of slum dwellers says ) क्लिक करा आणि वाचा- रेल्वे रूळ बाजूला असलेल्या घरांना तात्काळ खाली करण्याची नोटीस रेल्वे प्रशासनाकडून दिल्यानंतर या नोटिसांनंतर स्थानिक रहिवाश्यांमध्ये संभ्रम निर्माण झाली आहे. या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक राहत असून तीन ते चार पिढ्या या ठिकाणी राहत असून अचानक अशा नोटीस बजावून ते जाणार कुठे हे काही शक्य नाही.. एवढ्या वर्षानंतर सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर रेल्वे प्रशासनाला आठवल झाल्याचा आरोप करत एवढी वर्ष तीन ते चार पिढ्या त्या ठिकाणी काढल्यानंतर ७ दिवसात जागा खाली करणे शक्य आहे का? असा प्रश्न खासदारांनी उपस्थित केला. तुम्हाला जर ती जागा हवी असेल तर लोक तुम्हाला जागा द्यायला तयार आहेत. पण तुम्ही एसआरए किंवा पंतप्रधान आवास योजने सारख्या पॉलीसी उपलब्ध करून त्याचं पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे. क्लिक करा आणि वाचा- परंतु हे सगळ पुनर्वसन झाल्याशिवाय रेल्वे ने कुठलीही हालचाल करू नये. जर रेल्वेकडून बळाचा वापर करून किंवा दमदाटी करून हि जागा खाली करण्याचा प्रयत्न केला तर नागरिकांच्या आधी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून विरोध करू आणि स्थानिक नागरिकांच्या पाठीशी ठाम उभे राहू असा इशारा दिला आहे. लोकांना घाबरू नका निश्चिंत राहा असा दिलासा देखील यावेळी खासदारांनी दिला आहे. क्लिक करा आणि वाचा- कोविड काळ सुरु आहे यात घाबरलेल्या नागरिकांना आपण आणखीन घाबरवत असल्याची बाब रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांच्या लक्षात आणून दिली. तसेच रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी फोनद्वारे चर्चा केली असल्याचे सांगत यावर लवकरच राज्य प्रतिनिधी, संबंधित महापालिका अधिकारी आणि रेल्वे अधिकारी यांची बैठक घेऊन समन्वयाची भूमिका घेत या प्रकरणात मधला रस्ता काढून प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करा अन्यथा आम्ही रेल्वेला कुठलीही कारवाई करू देणार नसल्याचा इशारा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिला आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3FUizh0
https://ift.tt/3FMgqnv

Post a Comment

0 Comments