
नवी दिल्ली: अमेरिकेच्या क्रिकेट संघाने बुधवारी आयर्लंडविरुद्ध लॉडेरहिल येथे झालेल्या टी-२० सामन्यात २६ धावांनी विजय मिळवला. अमेरिकेच्या संघाने प्रथमच कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या संघाचा पराभव केलाय. क्रिकेटमध्ये अगदी नवखा असलेल्या अमेरिकेच्या संघासाठी हा ऐतिहासिक असा विजय म्हणावा लागले. विशेष म्हणजे अमेरिकेच्या या विजयात भारत, पाकिस्तान आणि गयाना या देशांचे मोठे योगदान होते. या देशात जन्मलेल्या खेळाडूंनी अमेरिकेकडून शानदार कामगिरी केली. वाचा- प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या अमेरिकेच्या संघाने १६ धावात चार विकेट गमावल्या. सामन्यातील दुसऱ्याच चेंडूवर अमेरिकेचा कर्णधार मोनांक पटेल बाद झाला. संघाने पहिल्या ३ विकेट लवकर गमावल्या. त्यानंतर महाराष्ट्रात जन्मलेल्या सुशांत मोदी आणि गुयानाचा गजानंद सिंह यांनी शानदार फलंदाजी केली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी १२६ धावांची भागिदारी केली. गजानंदने ४२ चेंडूत ३ चौकार आणि ५ षटकारांसह ६५ तर सुशांतने ३९ चेंडूत अर्धशतक केले. अंतिम षटकांत मार्टी केनने १५ चेंडूत ३९ धावांची स्फोटक खेळी केली. वाचा- अमेरिकेने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ६ बाद १८८ धावा केल्या. उत्तरादाखल आयर्लंडला २० षटकात १६२ धावा करता आल्या. मुंबईत जन्मलेल्या सौरभ नेत्रावाळकरने आयर्लंडचा सर्वात अनुभवी फलंदाज पॉल स्टार्लिंगची विकेट घेतली. पॉल चांगल्या फॉर्ममध्ये होता आणि त्याने १५ चेंडूत ३१ धावा केल्या होत्या. आयर्लंडने विजयासाठी खुप प्रयत्न केला, पण त्यांना विजय मिळवता आला नाही. त्यांच्याकडून लॉर्कन टकरने ४९ चेंडूत ५७ धावा केल्या. अमेरिकेकडून सौरभ, अली खान आणि निसार्ग पटेल यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.
from Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times https://ift.tt/3Eos07M
https://ift.tt/3sueMUs
0 Comments