
मुंबई : कोट्यवधी रुपयांची अफरातफर केल्याप्रकरणी अटकेत असलेला सध्या खूप चर्चेत आहे. आता या प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. यामध्ये बॉलिवूडमधील काही आघाडीच्या अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत. त्याचप्रमाणे एका अभिनेत्याचेही नाव या प्रकरणात उघड झाले आहे. आतापर्यंत याप्रकरणी ईडीने जॅकलीन फर्नांडिस आणि यांची चौकशी झालेली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात आणि या दोन अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत. ईडीने केलेल्या चौकशीमध्ये सुकेशने या दोन्ही अभिनेत्रींसोबत आपले संबंध असल्याचे मान्य केले आहे. सुकेशने हे देखील सांगितले आहे की, तो श्रद्धाला २०१५ पासून ओळखत आहे. तसेच एनसीबीच्या केसमध्ये त्याने श्रद्धाला मदत केली होती. श्रद्धाचे नाव दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणानंतर समोर आलेल्या ड्रग्ज प्रकरणामध्ये श्रद्धाचे नावआले होते. याप्रकरणी श्रद्धाची एनसीबीने चौकशी केली होती. हरमन बावेज सुकेशचा चांगला मित्र ईडीने केलेल्या चौकशीमध्ये सुकेशने असे ही सांगितले की, अभिनेता हरमन बावेजा त्याचा मित्र आहे. तसेच तो 'कॅप्टन' या सिनेमाचा सह निर्माता होता. या सिनेमामध्ये कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत आहे. हरमनशिवाय सुकेशने शिल्पा शेट्टी हिचे ही नाव या चौकशीत घेतले आहे. सुकेशने असेही सांगितले की, पोर्नोग्राफी प्रकरणी शिल्पाने त्याला संपर्क केला होता. सुकेशने शिल्पा त्याची चांगली मैत्रिण असल्याचेही सांगितले होते. आता ईडीची यांच्यावर आहे नजर सुकेशने ईडीच्या चौकशीमध्ये जे खुलासे केले आहेत, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणालाआणखी एक वेगळे वळण लागले आहे. २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाशी जॅकलीन फर्नांडिस, नोरा फतेही या दोघींशिवाय आता शिल्पा शेट्टी, श्रद्धा कपूर आणि हरमन यांचे नाव जोडले गेले आहे. आता हे तिघेही जण ईडीच्या रडारवर आले आहेत. जॅकलीन आणि नोराला महागड्या भेटवस्तू दरम्यान, सुकेशन जॅकलीन हिला खूप सा-या महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. या दोघांनी काढलेला सेल्फी सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला होता. त्यामुळे या दोघांचे अफेअर असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. नोराने देखील ईडी चौकशीमध्ये सुकेशने तिला महागडी गाडी भेट दिल्याचे कबूल केले होते.
from Entertainment News in Marathi: Celebrity News and Gossips Online | Maharashtra Times https://ift.tt/3E5bdpX
https://ift.tt/3sfYmyX
0 Comments