मुंबई : आणि यांनी मुंबईपासून दूर जाऊन राजस्थानमध्ये राजेशाही थाटात लग्न केले. सवाई माधोपूर येथे झालेल्या या आलिशान विवाह सोहळ्याची खूप चर्चा झाली. या विवाहसोहळ्याला दोघांचे कुटुंब आणि जवळचे मित्रमंडळी उपस्थित होते. सवाई माधोपूर येथील सिक्स सेंसेस फोर्ट चौछथ का बरवाडा या आलिशान हॉटेलमध्ये या दोघांचा राजेशाही विवाह सोहळ्या तीन दिवस सुरू होता. लग्नानंतर या दोघांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून काही खास फोटो शेअर केले आहेत. त्यावर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आता या दोघांच्या लग्नानंतर विकीच्या वडिलांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे... बॉम्बे टाईम्सला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये विकीचे वडील आणि प्रसिद्ध अॅक्शन डायरेक्टर शाम कौशल यांनी सांगितले की, 'कतरिनाने आमच्या कुटुंबात प्रवेश केल्यान आम्ही सर्वजण खूप आनंदीत झालो आहोत. तिच्यासारखी सून मिळल्याबद्दल आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. या दोघांवर भरभरून प्रेम करत त्यांना आशिर्वाद देणारे ईश्वर आणि सर्व शुभचिंतकांचे मनापासून आभार... या नवदांपत्यावर देवाची कृपा सदोदीत राहो... देवाची आमच्यावर अशीच कृपादृष्टी राहो...' कतरिनासोबत तुमचे नाते कसे आहे, असे विचारल्यावर ते म्हणाले, 'आधी या दोघांना नवदांपत्य म्हणून एकमेकांशी बोलू देत... त्यानंतर मी तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर देईन...' विकी कौशल आणि कतरिनाने त्यांच्या लग्नानंतर लगेचच सोशल मीडियावर फोटो शेअर केले. आता त्यांना त्यांच्या हळदी समारंभाचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हळदीच्या फोटोंमध्ये दोन्ही कुटुंब खूप आनंदात हा सोहळा साजरा करताना दिसत आहेत. हळदी समारंभातील एका फोटोमध्ये विकी आणि त्याचे वडील शाम यांच्यातील बाँडिंग दिसून येत आहे. यामध्ये विकीचे वडील त्यांच्या लाडक्या लेकाला हळद लावताना दिसत आहे. यावेळी या दोघांच्याही चेह-यावर आनंद दिसत आहे...
from Entertainment News in Marathi: Celebrity News and Gossips Online | Maharashtra Times https://ift.tt/3DIhDuZ
https://ift.tt/3pIfBWI
0 Comments