name plate

name plate

क्रिकेटमधून हरभजन सिंगची निवृत्ती, गीता बसराने लिहिलेली खास पोस्ट नक्की वाचा

मुंबई- सर्व क्रिकेट चाहत्यांमध्ये भज्जी म्हणून प्रसिद्ध असणारा क्रिकेटर याने सर्व क्रिकेट फॉर्मेट मधून निवृत्ती घेतली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने ही माहिती दिली आहे.त्याच्या या निर्णयावर आता पत्नी हिने एक भावनिक पोस्ट केली असून त्याच्या निर्णयाला समर्थन दिले आहे. गीताने हरभजन सोबतचे फोटो इंस्टाग्राम वर शेयर करत लिहिले की,'मला माहीत आहे तू या क्षणाची किती दिवस वाट पाहत होतास. मानसिकदृष्ट्या तू हा निर्णय आधीच घेतला होता पण आज भौतिकदृष्ट्यासुद्धा घेतला. मला आज सांगावसं वाटतं की, मला तुझा खूप अभिमान वाटतो, तू तुझ्या करिअरमध्ये खूप काही मिळवलं आहे. तुझा पुढे जाण्याचा हा प्रवास असाच सुरू राहणार आहे. पुढे अनेक गोष्टी तुझी वाट पाहत आहे. खेळताना मी तुझा ताण आणि उत्साह पाहिला आहे.' पुढे तिने लिहिले की, 'तुझ्या या अप्रतिम कारकिर्दीसाठी अभिनंदन. २३ वर्ष खेळणं सोपं नाही. मी खूप भाग्यवान आहे की तुझ्या सर्व चढ-उतारांमध्ये मी तुझ्या सोबत होते. आपली मुलगी हिनायानेसुध्दा तुला स्टेडियममध्ये खेळताना पाहिलं याचा मला आनंद आहे आणि मला माहीत आहे की हा शेवट नक्कीच नाही. तू अनेक गोष्टीवर प्रेम केलं, त्या मिळवण्यासाठी मेहनतही घेतली. परंतु नशीब आपल्या हातात नसते. तू नेहमी स्वतःला चांगल बनवण्यासाठी लढला आहे. पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.' दरम्यान, २४ डिसेंबर २०२१ रोजी हरभजन सिंग ने क्रिकेट मधून निवृत्ती घेतली आहे, यावेळी त्याने पोस्ट शेयर करत लिहिले की 'आज मी त्या खेळातून माघार घेत आहे, ज्यामुळे मला आयुष्यात सर्व काही मिळाले. माझा हा २३ वर्षाचा प्रवास सुंदर आणि संस्मरणीय बनवणाऱ्या सर्वांचा मी आभारी आहे.'


from Entertainment News in Marathi: Celebrity News and Gossips Online | Maharashtra Times https://ift.tt/3qqhrMw
https://ift.tt/3Jf6l5v

Post a Comment

0 Comments