
इस्लामाबाद: पाकिस्तानचे क्रिकेटपटू अनेकदा मैदानाबाहेरील घटनेमुळे चर्चेत येत असतात. मॅच फिक्सिंग किंवा अन्य कोणत्या तरी घटनेमुळे वादात अडणाऱ्या पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंपैकी एकावर आता धक्कादायक असा आरोप करण्यात आला आहे. इस्लामाबादमधील शालीमार पोलिस ठाण्यात एका १४ वर्षीय मुलीने फिरकीपटू यासिर शाह याच्यावर एक गंभीर असा आरोप करून त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय. वाचा- एका १४ वर्षीय मुलीने शाहवर बलात्कार आणि लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल केला आहे. मुलीने दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, यासिर शहाच्या मित्राने बंदुकीच्या धाकावर बलात्कार केला आणि त्याचा व्हिडिओ देखील केला. मुलीने तिचे शोषण केल्याचा आरोप देखील केलाय. पाकिस्तानमधील वेबसाईट जिओ न्यूजनुसार संबंधित मुलीने या प्रकरणी वॉट्सअॅपवरून यासिर सोबत बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने माझी चेष्टा केली. इतक नव्हे तर यासिरने तिला असे देखील सांगितले की मला कमी वयाच्या मुली आवडतात. वाचा- पीडित मुलीने असे देखील म्हटले आहे की, यासिरने तिला गप्प बसण्याची धमकी देखील दिली. जर ही गोष्ट कोणाला सांगितली तर त्याचे परिणाम भोगावे लागतील. एका मोठ्या अधिकाऱ्याला ओळखतो. तो आणि फरहान वयाने लहान असलेल्या मुलीवर बलात्कार करतात. या प्रकरणी जेव्हा मी पोलिसांकडे तक्रार करण्यास गेले तेव्हा यासिरने घर खरेदी करून देण्याचे तसेच पुढील १८ वर्ष माझा खर्च उचरण्याची ऑफर दिली.
from Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times https://ift.tt/32cOjjH
https://ift.tt/3Fij8Sq
0 Comments