name plate

name plate

PM मोदी आज गोव्याच्या दौऱ्यावर जाणार, ६५० कोटींच्या योजनांची भेट देणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी आज गौव्याच्या दाऱ्यावर जाणार आहेत. गोवा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते सहभागी होतील. यासोबतच ते विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजनही करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली. पंतप्रधान मोदी हे श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियममधील गोवा मुक्ती दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होतील. स्वातंत्र्य सैनिकांचा गौरव करणार गोव्याची पोर्तुगालच्या शासनातून मुक्ती करण्यासाठी भारतीय सुरक्षा दलांनी 'ऑपरेशन विजय' ही मोहीम राबवली होती. या मोहीमेतील स्वातंत्र्य सैनिकांचा पंतप्रधान मोदी सन्मान करतील. यासह अगौडा जेल संग्रहालय, गोवा मेडिकल कॉलेजमधील सुपर स्पेशलिटी विभाग आणि न्यू साऊथ गोवा जिल्हा हॉस्पिटलसह इतर योजनांचे उद्घाटन करतील. गॅस सब-स्टेशनचेही उद्घाटन करणार पंतप्रधान मोदी मोपा विमानतळावरील एव्हिएशन स्किल डेव्हलपमेंट सेंटर आणि मडगावमधील दाबोलिम-नवेलीम येथे गॅस उपकेंद्राचेही उद्घाटन करतील, असं पीएमओने सांगितलं. कायदेशीर शिक्षण आणि संशोधनासाठी इंडिया इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीची पायाभरणीही पंतप्रधान मोदी करतील. गोव्यात पुढील वर्षाच्या सुरवातीला विधानसभा निवडणुका होणार आहेत. तसंच भारतीय सैन्याने पोर्तुगीजांच्या ताब्यातून गोवा मुक्त केल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 'गोवा मुक्ती दिन' साजरा केला जातो.


from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3q3Dkku
https://ift.tt/3e3NTP5

Post a Comment

0 Comments