
नवी दिल्ली : सध्या ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीग सुरू आहे. ज्यामध्ये आज पर्थ स्कॉचर्स आणि मेलबर्न स्टार्स यांच्यात सामना होणार होता, पण नाणेफेक होण्यापूर्वीच हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सामना सुरू व्हायला तीन तास बाकी असताना संघाच्या एका सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक निवेदन जारी केले आहे की, स्टार्सचे सर्व खेळाडू आणि कर्मचारी जे कोरोना संक्रमित आढळलेल्या व्यक्तीच्या संपर्कात होते, त्यांची त्वरित पीसीआय (PCI) चाचणी केली जाणार आहे. बिग बॅश लीगचे महाव्यवस्थापक अॅलिस्टर डॉब्सन म्हणाले की, "स्टार्स संघातील हे प्रकरण पाहिल्यानंतर आज रात्री होणारा सामना पुढे ढकलणे, हा एकमेव पर्याय होता. लीगमध्ये अनेक जैवसुरक्षा प्रोटोकॉल आहेत, जेणेकरून त्यामध्ये सहभागी होणार्या सर्व खेळाडूंना सुरक्षित ठेवता येईल. स्टार्सचा संघ पुन्हा मैदानात उतरेल यासाठी आम्ही त्यांच्यासोबत काम करू.” प्रकरणाची चौकशी होणार क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे की, कोरोना संक्रमण उर्वरित संघांमध्येही पसरले आहे की नाही, याचा तपास करणार आहे. स्टार्सला त्यांचा पुढचा सामना पर्थविरुद्ध २ जानेवारीला खेळायचा आहे. हा सामना लीगचा ब्लॉगबस्टर सामना होता, कारण ऑस्ट्रेलियाच्या टी-२० विश्वचषक विजेत्या संघातील ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस आणि अॅडम झॅम्पा यांचा सामना मिचेल मार्शच्या संघाशी होणार होता. तसेच पाकिस्तानचा गोलंदाज हारिस रौफचा स्टार्ससोबतचा हा पहिलाच सामना होता. अशा टेबलची स्थिती सध्या सिडनी सिक्सर्सचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर कायम आहे. तर दुसऱ्या स्थानावर पर्थ स्कॉचर्स आहे. दोघांचे २१-२१ गुण आहेत. हॉबार्ट हरिकेन्स १७ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. सिडनी थंडर १३ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. ब्रिस्बेन हीट पाचव्या, तर मेलबर्न स्टार्स सहाव्या स्थानावर आहेत. अॅडलेड स्ट्रायकर्सचे सात गुण आहेत आणि ते सातव्या स्थानावर आहेत. मेलबर्न रेनेगेड्स पाच गुणांसह आठव्या स्थानावर आहे.
from Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times https://ift.tt/3FFIp9p
https://ift.tt/3mKOGch
0 Comments