name plate

name plate

रोनाल्डोचा पुतळा बसवण्यावरून गोव्यात राडा; पोर्तुगीज कनेक्शनमुळे लोक भडकले

पणजी : गोव्यातील समुद्रकिनारी असलेल्या कलंगुट गावातील एका उद्यानात ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या मोठ्या पितळी पुतळ्याचे अनावरण करण्यात आले, ज्यामुळे सध्या गोव्यात खळबळ उडाली आहे. फुटबॉलपटूंच्या पोर्तुगीज संबंधांवरून किनारपट्टीच्या राज्यात खळबळ उडाली. मंगळवारी (२८ डिसेंबर) या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. या दिग्गज खेळाडूकडून तरुणांना प्रेरणा मिळावी, हा त्यामागचा उद्देश होता, पण आंदोलकांनी या ठिकाणी काळे झेंडे दाखवत निदर्शने केली. अर्जुन पुरस्कार विजेते आणि भारतीय संघाचे माजी कर्णधार ब्रुनो यांसारख्या स्थानिक फुटबॉल दिग्गजांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. वाचा- स्थानिक भाजप आमदार आणि गोव्याचे बंदर मंत्री मायकल लोबो म्हणाले की, 'रोनाल्डोचा हा भारतातील पहिला पुतळा आहे. आणि फुटबॉल खेळाला आणखी चांगल्या उंचीवर नेण्यासाठी हा पुतळा आमच्या तरुणांना प्रेरणा देईल. आम्हाला सरकारकडून चांगली मैदाने, चांगल्या पायाभूत सुविधा आणि चांगले प्रशिक्षक हवे आहेत.' वाचा- लोबो पुढे म्हणाले की, ''भारताची लोकसंख्या प्रचंड असूनही देशाचा फुटबॉल संघ लहान देशांच्या संघांना हरवू शकत नाही. त्यामुळे गोव्याला आणि भारताला विशेष ओळख मिळवून देणाऱ्या खेळाडूंना गोव्यातील प्रत्येक गावात योग्य प्रशिक्षण सुविधा देण्यात याव्यात. जे लोक पार्कमध्ये येतील, त्यांना त्याच्यासारखे बनण्याची आणि गोवा आणि भारतासाठी खेळण्याची प्रेरणा मिळेल." वाचा- .. कलंगुटमधील टिटोस या लोकप्रिय नाइटक्लबचे मालक रिकार्डो डिसोझा म्हणाले की, 'रोनाल्डोऐवजी ब्रुनो कॉटिन्हो आणि समीर नाईक या स्थानिक फुटबॉल खेळाडूंचे पुतळे उभारायला हवे होते. रोनाल्डोचा पुतळा उभारण्यात आला, हे ऐकून खूप निराश झालो. समीर नाईक आणि ब्रुनोसारख्या आपल्या आयकॉन खेळाडूंचा अभिमान बाळगायला शिका.' वाचा- अनावरण समारंभावेळी काही उजव्या विचारसरणीच्या आंदोलकांनी असा आरोप केला की, पोर्तुगीज असलेल्या रोनाल्डोचा पुतळा उभारणे, हा गोव्याचा अपमान आहे. कारण गोवा राज्य पोर्तुगीज राजवटीपासून स्वातंत्र्याचा ६० वा वर्धापन दिन साजरा करत आहे.


from Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times https://ift.tt/3EIHinQ
https://ift.tt/3zbpoJd

Post a Comment

0 Comments