name plate

name plate

क्रिकेटवर पुन्हा एकदा संक्रांत; वनडे मालिका रद्द

फोर्ट लॉडरडेल: जगभरात पुन्हा एकदा करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. याचा फटका क्रिकेटसह अन्य खेळांना बसत आहे. भारताचा संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. हा दौरा सुरू होण्याआधी करोनाच्या ओमिक्रॉन वेरियंट रुग्णांची संख्या वाढल्याने फक्त कसोटी आणि वनडे मालिका खेळण्याचा निर्णय घेतला गेला तर टी-२० मालिका नंतर खेळवली जाणार आहे. वाचा- याआधी जेव्हा करोनामुळे जगभरात लॉकडाऊन करण्यात आले होते तेव्हा जवळ जवळ वर्षभर क्रिकेट सामने खेळवण्यात आले नव्हते. आता पुन्हा एकदा करोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याने क्रिकेटला त्याचा फटका बसत आहे. अमेरिका आणि आयरर्लंड यांच्यात सुरू असलेली करण्यात आली आहे. आयरर्लंड संघाच्या सपोर्ट स्टाफमधील दोघा सदस्यांना करोनाची लागण झाल्याने हा निर्णय घेण्यात आला. या शिवाय खेळाडूंच्या कुटुंबातील व्यक्तींना करोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. संघातील सर्व खेळाडूंचा रिपोर्ट नेगेटिव्ह आलाय. वाचा- दोन्ही देशातील ३ सामन्यांची मालिका होणार होती. त्यातील पहिली मॅच रद्द करण्यात आली तर दुसरी मॅच एका दिवसासाठी स्थगित करण्यात आली आहे. कारण अंपायरिंग करणाऱ्या टीममधील आणि अमेरिकेच्या संघातील काही सदस्यांना करोनाची लागण झाली आहे. अमेरिका क्रिकेट आणि आयरर्लंड क्रिकेटने दिलेल्या माहितीनुसार करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने दोन्ही क्रिकेट बोर्डांनी मिळून दोन मॅच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघात झालेली टी-२० मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.


from Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times https://ift.tt/3qAekkX
https://ift.tt/3pxpIyW

Post a Comment

0 Comments