
मुंबई: दाक्षिणात्य अभिनेता लवकरच ‘’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण, सध्या तो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे ते एका वेगळ्याच कारणाने. प्रभासने एक पोस्ट सोशल मीडियावर केलीय; ज्यात त्यानं अभिनेते-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचं कौतुक केलं आहे. सोबतच आगामी ‘’ या मराठी चित्रपटाला शुभेच्छाही दिल्या आहेत. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. मराठी चित्रपटांवर प्रेम करणारे प्रेक्षक यामुळे खुशीत आहेत. अभिनेता गश्मीर महाजनी या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असून, यांची व्यक्तिरेखा स्वतः प्रवीण तरडे साकारत आहे. चित्रपटाची निर्मिती शिवनेरी फाउंडेशन करत असून संदिप रघुनाथराव मोहिते पाटील, सौजन्य सुर्यकांतराव निकम, धर्मेंद्र सुभाषजी बोरा हे चित्रपटाचे निर्माते आहेत. तर चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रविण विठ्ठल तरडेचे असणार आहेत.
from Entertainment News in Marathi: Celebrity News and Gossips Online | Maharashtra Times https://ift.tt/3qpLTpQ
https://ift.tt/3yXiSpi
0 Comments