name plate

name plate

Breakup- 'नातं तर केव्हाचं संपलेलं पण...', सुष्मिता सेन- रोहमन शॉल झाले विभक्त

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री आणि तिचा बॉयफ्रेंड यांच्या ब्रेकअपच्या बातम्या सातत्याने येत होत्या. दरम्यान, सुष्मिताने रोहमनसोबतच्या तिच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीने स्पष्ट केलं की ते दोघं आता एकत्र नसून त्यांचं ब्रेकअप झालं.  सुष्मिताने गुरुवारी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला. यामध्ये ती रोहमनसोबत दिसत आहे. सुष्मिताने या फोटोला कॅप्शन देताना लिहिले की, 'आमचे नाते मैत्रीपासून सुरू झाले, आम्ही मित्र राहूच. नातं फार पूर्वी संपलं, प्रेम राहिलं.' सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल २०१८ पासून एकमेकांना ओळखतात. रोहमन फार लवकर सुष्मिताच्या मुली आणि तिच्या कुटुंबाच्या जवळ पोहोचला. तो अनेकदा सुष्मिताच्या कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये त्यांच्यासोबत दिसायचा. एवढंच नाही तर सहकुटुंब सुट्टीला जातानाही रोहमन त्यांच्यासोबत असायचा. यापूर्वी, सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल यांच्या जवळच्या एका सूत्राने ई-टाइम्सला माहिती दिली होती की दोघांनीही त्यांचं नातं संपवलं आहे. रोहमन आता सुष्मिताच्या घरीही राहत नाही. तो मित्राच्या घरी शिफ्ट झाला आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये सुष्मिता सेनने एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये तिने बिघडलेल्या नात्यातून बाहेर पडण्याबद्दल लिहिले होते. यानंतर चाहत्यांनी अंदाज लावला की तिचा रोहमन शॉलसोबत ब्रेकअप झाला आहे का? मात्र, या जोडप्याने सार्वजनिक स्वरूप देऊन या अफवेला पूर्णविराम दिला.


from Entertainment News in Marathi: Celebrity News and Gossips Online | Maharashtra Times https://ift.tt/32iplzA
https://ift.tt/3JjCIAe

Post a Comment

0 Comments