name plate

name plate

कोण जिंकणार पहिली कसोटी? भारत, द.आफ्रिका की ...; जाणून घ्या आजचे हवामान

सेंच्युरियन: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली कसोटीत रोमांचक वळणावर आहे. आज म्हणजे गुरुवारी सामन्याचा पाचवा आणि अखेरचा दिवस आहे. यजमान दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २११ तर भारताला ६ विकेटची गरज आहे. आज भारताने सहा विकेट मिळवल्या तर कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच टीम इंडिया सेंच्युरियन मैदानावर विजय मिळवेल. या दोन संघांशिवाय आणखी एक घटक आहे ज्याचा विजय होऊ शकतो पण क्रिकेट चाहत्याची इच्छा अशा विजयाची नक्कीच नसेल. वाचा- पहिल्या कसोटीचा दुसरा दिवस पावसामुळे वाया गेला होता. तेव्हाच या सामन्याचा निकाल लागेल की नाही याबद्दल शंका व्यक्त केली होती. पण प्रथम दक्षिण आफ्रिकेच्या आणि नंतर भारतीय गोलंदाजांनी कमाल केली आणि सामन्यात रंगत आणली. आता आज अखेरच्या दिवशी सेंच्युरियनवर हवामान कसे असेल हे जाणून घेऊयात. हवामान विभागाच्या अंदाजानुसार भारतासाठी चांगली बातमी नाही. एक्युवेदर डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार ३० डिसेंबर रोजी म्हणजे आज दोन तास पावसाची शक्यता आहे. त्याच बरोबर ढगाळ वातावरण असेल. विजांचा कडकडात होण्याची शक्यता असल्याचे अंदाजात म्हटले आहे. तापमान २८ डिग्री सेल्सियस असेल. वाचा- सामन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी सकाळपासून सातत्याने पाऊस सुरु होता. त्यामुळे एकही चेंडू टाकता आला नाही. दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतली होती. पण अंपायर्सनी मैदानाचा आढावा घेण्याच्या काही मिनिटे आधी पुन्हा पावसाला सुरूवात झाली होती. कसोटीत सध्या भारताला विजयाची संधी अधिक आहे. दक्षिण आफ्रिकेने ४ विकेटच्या बदल्यात ९४ धावा केल्या आहेत. येथून पुन्हा कमबॅक करणे अवघड आहे. खेळपट्टीमध्ये अद्याप दम असल्याने चेंडू उसळी घेतोय. जसप्रीत बुमराह शानदार गोलंदाजी करत आहे. त्याला मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांची चांगली साथ मिळत आहे. काल शार्दूल ठाकूरने आफ्रिकेचा कर्णधार एल्गरला अडचणीत आणले होते. वाचा-


from Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times https://ift.tt/3JpFq78
https://ift.tt/3pEv8rP

Post a Comment

0 Comments