
मुंबई : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सगळेजण प्लॅन आखत आहेत, तर काही जण नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज देखील झाले आहेत. बॉलिवूडमधील कलाकारमंडळी देखील याला अपवाद नाहीत. अनेक कलाकार नवीन वर्षाचे स्वागत मुंबईच्या बाहेर जाऊ लागले आहेत. लवबर्ड्स सिद्धार्थ मल्होत्रा- कियारा आडवाणी मालदीवला रवाना झाले आहेत. तर अक्षय कुमार त्याच्या बायकोचा वाढदिवस आणि नवीन वर्षाचे स्वागत त्यांच्या लेकीसोबत मालदीवमध्ये करणार आहेत. सलमान खानचा वाढदिवस साजरा केल्यानंतर आता सोहेलखान, सलमानची आई, अर्पिता-आयुष आणि त्यांची मुले सुट्ट्या साज-या करण्यासाठी रवाना झाले आहेत. आता या लिस्टमध्ये बॉलिवूडमधील लवबर्ड्स आणि आलिया भट्ट यांचाही समावेश जाला आहे. हे दोघेजण नवीन वर्षाचे स्वागत करायला नेमके कुठे गेले आहेत, याची माहिती मिळालेली नाही. रणबीर कपूर आणि हे दोघेजण मुंबई विमानतळावर एकत्रित दिसले. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे दोघांनी एकाच रंगाचे ड्रेस घातले होते. ते पाहून चाहते त्यावर भरभरून कॉमेन्ट करत आहेत. एका चाहत्याने लिहिले की, 'बॉलिवूडमधील पुढचे लग्न यांचेच होणार आहे...' तर दुस-या चाहत्याने लिहिले, 'हॉटेस्ट कपल' रणबीर आणि आलिया देखील नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मालदीवला गेले असावेत, असा अंदाज काही चाहत्यांनी लावला आहे. हृतिक रोशन, टायगर श्रॉफ आणि दिशा पटनी, अक्षय कुमा ट्विंकल खन्ना, सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी देखील यावेळी एकमेकांसोबत क्वालिटी टाईम घालवत आहेत. रणबीर आणि आलिया अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. लवकरच या दोघांनी एकत्रित काम केलेला ब्रह्मास्त्र सिनेमा रिलीज होणार आहे. हा सिनेमा अयान मुखर्जी याने दिग्दर्शित केला आहे. याशिवाय आलियाचा गंगुबाई काठियावाडी, आरआरआर, रॉकी और रानी की प्रेम कहानी या सिनेमांतही दिसणार आहे. तर रणबीर कपूर शमशेरा या सिनेमात दिसणार आहे.
from Entertainment News in Marathi: Celebrity News and Gossips Online | Maharashtra Times https://ift.tt/3zblwrY
https://ift.tt/347kKkf
0 Comments