name plate

name plate

कपूर कुटुंबात करोनाचा शिरकाव; अर्जुनसोबत आणखी तीन जणांना लागण

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. काही दिवसांपूर्वी करीना कपूर आणि अमृता अरोरा यांना देखील करोनाची लागण झाली होती. या दोघीजण करोनातू ब-या झाल्या आहेत. आता त्यांच्या पाठोपाठ आता कपूर कुटुंबातील चौघा सदस्यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ई टाइम्सला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , , आणि तिचा नवरा करण बुलानी यांना करोनाची लागण झाली आहे. हे सर्वजण घरात क्वारंटाईन आहेत. बोनी कपूर यांना बरे वाटत नसल्याने त्यांची करोना चाचणी करण्यात आली. सुदैवाने ती निगेटिव्ह आली आहे. अनिल कपूरची देखील करोना चाचणी करण्यात आली असून त्याचा रिझल्ट निगेटिव्ह आला आहे. अर्जुन, अंशुला, रिया आणि करण यांच्या करोनाची सौम्य लक्षणे दिसली आहे. याबाबत अर्जुनशी संपर्क साधला असता, त्याने काहीही बोलण्यास नकार दिला. मुंबई उपनगरातील एका हॉटेलमध्ये अर्जुन वास्तव्याला आहे.त्याचे चित्रीकऱण सुरू असल्याने तो तिथे वास्तव्याला होता. परंतु आता तो हॉटेलमध्ये एकटाच आहे. दरम्यान, मंगळवारी रणवीर शौरी आणि कोंकणा सेन यांच्या दहा वर्षांच्या मुलाला करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. रणवीर आणि त्याचा मुलगा नुकताच गोव्याहून मुंबईला परतला आहे. रणवीरने सांगितले की की, 'माझा मुलगा हरून आणि मनी गोव्याला सुट्ट्यांवर गेलो होते. तिथून परतल्यावर आम्ही आरटीपीआर चाचणी केली. त्यात करोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर आम्ही दोघेजण तातडीने क्वारंटाईन झालो आहोत आणि योग्य ते वैद्यकीय उपचार सुरू आहेत. करोनाची ही लाट खऱी आहे. माझे दोन्ही व्हॅक्सिन झाले होते तरी मला करोनाची लागण झाली.'


from Entertainment News in Marathi: Celebrity News and Gossips Online | Maharashtra Times https://ift.tt/3EBa6Pk
https://ift.tt/3FGrCD8

Post a Comment

0 Comments