name plate

name plate

भारतीय क्रिकेटपटू दुसऱ्यांदा झाला बाप; मुलाचे नाव केले जाहीर

नवी दिल्ली: भारताचा माजी ऑलराउंडर क्रिकेटपटू दुसऱ्यांदा बाप झाला आहे. इरफानने सोशल मीडियावरून याची माहिती दिली. त्याने मंगळवारी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि ही आनंदाची बातमी सर्वांनी दिली. या फोटोत इरफानने मुलाचे नाव काय आहे याचा देखील खुलासा केलाय. वाचा- रुग्णालयातील एक फोटो इरफानने शेअर केला असून त्यात स्वत: इरफान मुलाला घेऊन उभा आहे. फोटो शेअर करताना तो म्हणतो, सफा आणि मी सुलेमान खानचे स्वागत करतो. आई आणि मुल दोघांची प्रकृती चांगली आहे. वाचा- सफा आणि इरफान यांचा विवाह फेब्रुवारी २०१६ मध्ये मक्का येथे झाला होता. हा विवाह देखील हाय प्रोफाइल होता आणि अतिशय गुप्तपणे पार पाडला होता. विवाहात काही जवळचे नातेवाइक आणि मित्र उपस्थित होते. सफाचे वडील मिर्जा फारूख बेग सौदी अरेबियामधील उद्योगपती आहेत. सफा आणि इरफानची पहिली भेट दुबईमध्ये झाली होती. त्याच वर्षी इरफान आणि सफा यांना पहिला मुलगा झाला होता. पहिल्या मुलाचे नाव इमरान खान असे ठेवण्यात आले होते. वाचा- वाचा- क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर इरफान सध्या समालोचकाच्या भूमिकेत आहे. त्याने भारताकडून २९ कसोटी, १२० वनडे, २४ टी-२० सामने खेळले आहेत. भारताकडून त्याने ३०१ विकेट घेतल्या आहेत. २००७च्या पहिल्या टी-२० वर्ल्डकप संघात तो होता. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या फायनल मॅचमध्ये इरफानने १६ धावा देत ३ विकेट घेतल्या होत्या. वर्ल्डकमध्ये त्याने १४.९०च्या सरासरीने १० विकेट घेतल्या होत्या. अंतिम सामन्यात इरफानला सामनावीर पुरस्कार मिळाला होता.


from Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times https://ift.tt/3sEANjJ
https://ift.tt/3Jp9rE4

Post a Comment

0 Comments