नवी दिल्ली: ऐतिहासिक अॅशेस मालिकेत एकापाठोपाठ एक करोना व्हायरसचे रुग्ण सापडत आहेत. चौथ्या कसोटीच्या आधी अॅशेस मालिकेत करोनाचा स्फोट झाला असून क्रिकेट मॅच रेफरी, इंग्लंड संघाचे कोच आणि स्टाफ सदस्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना करोना झाल्याचे समोर आल्यानंतर आता ऑस्ट्रेलिया संघातील स्टार फलंदाजाला करोनाची लागण झाली आहे. वाचा- चौथ्या कसोटीच्या आधी ऑस्ट्रेलिया संघातील स्टार फलंदाज याचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ऑस्ट्रेलिया संघासाठी हा मोठा झटका मानला जात आहे. हेडला चौथ्या कसोटीत खेळता येणार नाही. त्याच्या जागी उस्मान ख्वाजा याला संधी मिळू शकते. ख्वाजाने २०१९ नंतर एकही कसोटी मॅच खेळली नाही. वाचा- अॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटीनंतर सामनाधिकारी डेव्हिड बून यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. तर इंग्लंड संघातील सात जणांना करोनाची लागण झाल्याने मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवुड हे देखील आयसोलेशनमध्ये गेले आहे. ते चौथ्या कसोटीत संघासोबत असणार नाहीत. इंग्लंड संघातील कोणत्याही खेळाडूला करोनाची लागण झाली नव्हती. पण आता ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडूला करोनाची लागण झाल्याने मालिका अडचणीत येण्याची शक्यता आहे. वाचा- चौथी कसोटी ५ जानेवारीपासून सिडनी मैदानावर होणार आहे. यासामन्यात हेडच्या जागी ख्वाजाला संधी मिळू शकते. पाकिस्तानमध्ये जन्मलेला ख्वाजा ऑस्ट्रेलियाकडून खेळणारा पहिला मुस्लिम क्रिकेटपटू आहे. उस्मान ख्वाजा पाच वर्षाचा असताना त्याचे कुटुंबीय ऑस्ट्रेलियात आले होते. दोन वर्ष अंतिम ११ मध्ये स्थान मिळवण्यासाठी वाट पाहणाऱ्या ख्वाजाला २०१०-११ मध्ये अॅशेस मालिकेत संधी मिळलाी होती. त्याने दमदार कामगिरी देखील केली. ऑस्ट्रेलियाच्या देशांतर्गत शेफील्ड शील्ड स्पर्धेत देखील तो जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. वाचा- इंग्लंड संघाच्या खराब कामगिरीमुळे या वर्षी अॅशेस मालिकेत फार चांगली लढत पाहायला मिळाली नाही. ऑस्ट्रेलियाने पहिल्या तिनही लढतीत एकतर्फी विजय मिळवला आणि मालिका जिंकली. आता उर्वरित दोन लढतीत जो रूटच्या नेतृत्वाखाली खेळणारा इंग्लंडचा संघ कशी लढत देतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
from Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times https://ift.tt/3FMgULo
https://ift.tt/3zchj7l
0 Comments