सेंच्युरियन: भारताविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा ११३ धावांनी पराभव झाला. सेच्युरियनमध्ये प्रथमच एखाद्या आशिया संघाकडून दक्षिण आफ्रिकेचा पराभव झाला. या पराभवानंतर आफ्रिकेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. संघातील विकेटकीपर आणि फलंदाज क्विंटन डी कॉकने कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर केली आहे. वाचा- भारताविरुद्ध झालेल्या सेंच्युरियन कसोटीत डी कॉकने पहिल्या डावात १०० मिनिटे फलंदाजी करून ३४ धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात त्याने २८ चेंडूत २१ धावा केल्या. भारताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर काही तासात त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली. वाचा- वाचा- डी कॉकने दक्षिण आफ्रिकेकडून ५४ कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने ३८.८२च्या सरासरीने ३ हजार ३०० धाववा केल्या आहेत. डी कॉकच्या घरी लवकरच गुड न्यूज येणार असून तो लवकरच बाप होणार आहे. अशात कुटुंबासोबत वेळ घालवण्याची त्याची इच्छा आहे. हा असा निर्णय नाही जो मी अगदी सहजपणे घेतला. यासाठी मी खुप विचार केला. माझे भविष्य कसे असेल, आयुष्यातील प्राधान्य काय आहे या सर्वा गोष्टींचा विचार करून हा निर्णय घेतलाआहे. लवकर माझ्या घरी नव्या मुलाचे स्वागत करणार आहे. माझे कुटुंब आता मोठे होत आहे, असे डी कॉकने म्हटले आहे. डी कॉकने कसोटीतून निवृत्ती घेतली असली तरी ते मर्यादित षटकाच्या क्रिकेटमध्ये खेळणार आहे. याचा अर्थ भारताविरुद्ध १९ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या वनडे मालिकेत तो खेळताना दिसेल. असे असले तरी भारताविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या कसोटीच्या आधी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.
from Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times https://ift.tt/3Hnq0yh
https://ift.tt/340aav8
0 Comments