name plate

name plate

दुसऱ्या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वीच राहुल द्रविड यांनी केला मोठा खुलासा, विराट कोहली बद्दल म्हणाले...

जोहान्सबर्ग : सेंच्युरियनच्या सुपर स्पोर्ट्स पार्कमध्ये भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवला. पहिल्या कसोटी सामन्यात कोहली आणि टीमने यजमानांचा ११३ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करत आशियातील पहिला आणि जगातील तिसरा संघ बनण्याचा नवा विक्रम केला. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्वजण विजयाच्या जल्लोषात मग्न झाले होते. स्वत: पत्रकार परिषदेला येईल, अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. असे का घडले हे संघाचे मुख्य प्रशिक्षक यांनी सांगितले आहे. द्रविड यांना ऑनलाईन पत्रकार परिषदेत याबाबत विचारले असता, त्यांनी यावरून पडदा हटवला. ते म्हणाले, 'हे बघा, पत्रकार परिषदेला कोण जाणार हे मी ठरवत नाही. ही मीडिया टीम ठरवते. तो (विराट कोहली) लवकरच तुमच्यासमोर येईल. मला सांगण्यात आले आहे की, तो केपटाऊनमध्ये त्याच्या आगामी शतकाची तयारी करत आहे. त्याआधी तो तुम्हा सर्वांसमोर येईल.' कर्णधारपदाच्या वादानंतर विराट कोहली दक्षिण आफ्रिकेत पोहोचल्यापासून माध्यमांसमोर आलेला नाही. प्रमुख सौरव गांगुलींनी केलेल्या विधानाच्या उलट कोहलीने विधान केले होते. कोहली म्हणाला होता की, या कसोटी संघाच्या निवडीवेळी मला सांगण्यात आले होते की, यापुढे मी एकदिवसीय संघाचा कर्णधार असणार नाही. दुसरीकडे गांगुलींनी याबाबत आपण स्वतः विराटशी बोललो असल्याचे सांगितले होते. कोहलीने आतापर्यंत ९८ कसोटी खेळल्या आहेत आणि ५०.३५ च्या सरासरीने ७८५४ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ७ द्विशतकांसह २७ शतके आणि २७ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्या नावावर अनेक महत्त्वाचे रेकॉर्ड आहेत. कोहलीला राहुल द्रविडचा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे. भारतीय म्हणून दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत द्रविड दुसऱ्या क्रमांकावर आहे. द्रविडने ११ सामन्यात ६२४ धावा केल्या आहेत, तर कोहलीने ६ कसोटी सामन्यात ६११ धावा केल्या आहेत. त्यामुळे आता जोहान्सबर्गमध्ये होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात कोहली द्रविडचा विक्रम मोडणार का, याची उत्सुकता सर्वांनाच असेल.


from Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times https://ift.tt/3FORb4U
https://ift.tt/3mRJvHs

Post a Comment

0 Comments