name plate

name plate

'काहीही करा, पण स्पर्धा सोडून लवकर घरी या'; करोनाच्या प्रकोपामुळे क्रिकेट मंडळाचा खेळाडूंना आदेश

नवी दिल्ली : सध्याच्या घडीला करोनाचा प्रसार जोराने वाढत असल्याचे सर्वांनाच माहिती आहे. त्या पार्श्वभूमीवर आता क्रिकेट मंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. वाढत्या करोनामुळे काहीही करा, पण स्पर्धा सोडून लवकर घरी या, असा आदेश आता क्रिकेट मंडळाने काढला आहे. आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने () ऑस्ट्रेलियाच्या टी-२० लीग बिग बॅशमध्ये खेळणाऱ्या आपल्या सर्व खेळाडूंना मायदेशी परतण्यास आणि आयसोलेट होण्यास सांगितले आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने यासाठी ७ जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे. येत्या शुक्रवारपर्यंत ६ इंग्लिश खेळाडू मायदेशी परतणार आहेत, अशी माहिती पुढे आली आहे. यामध्ये सॅम बिलिंग्ज, जॉर्ज गार्टन, टिमल मिल्स, रीस टॉपले, शाकिब महमूद आणि जेम्स विन्स यांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियात पसरू लागलेला कोरोना आणि आगामी वेस्ट इंडिज दौरा ही कारणे या निर्णयामागे आहेत. वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी खेळाडूंमध्ये कोरोनाची लक्षणे दिसायला नको, असे ईसीबीला वाटते. इंग्लंडचा वेस्ट इंडिज दौरा २२ जानेवारीपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यात इंग्लंडला ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. ईसीबीच्या निर्णयाचा बीबीएलवर होणार परिणाम बिग बॅश सध्या मध्यंतरात आहे. ही स्पर्धा २८ जानेवारीपर्यंत चालणार आहे, पण इंग्लंड क्रिकेटने या लीगमध्ये खेळणाऱ्या आपल्या खेळाडूंना ७ जानेवारीपूर्वी मायदेशी परतण्यास सांगितले आहे. या निर्णयामुळे काही संघांच्या स्पर्धा जिंकणाच्या आशा यामुळे मावळू शकतात. अॅशेसवरही कोरोनाचे सावट ऑस्ट्रेलियात कोरोनाचा कहर सातत्याने वाढत चालला आहे. अॅशेस मालिकेलाही त्याचा फटका बसला आहे. कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव इंग्लंड कॅम्पवर दिसून आला आहे. इंग्लंड कॅम्पमधील सुमारे ७ ते ८ लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. एकाही इंग्लिश खेळाडूला आतापर्यंत कोरोनाची लागण झाली नाही, हीच दिलासादायक बाब आहे, पण संघाचे मुख्य प्रशिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, त्यामुळे त्यांना सिडनी कसोटीतून बाहेर पडावे लागले आहे. ऑस्ट्रेलियतील वाढत्या करोनामुळेच आता इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने खेळाडूंना स्वगृही बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.


from Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times https://ift.tt/32NrgvL
https://ift.tt/3FNNn3X

Post a Comment

0 Comments