AUS vs ENG : सिडनी : पिंक टेस्टच्या काही दिवस आधीच ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज कोविड-१९ पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. मॅकग्राची पत्नी जेन हिच्या स्मृतीप्रित्यर्थ खेळवली जाते. जेनचा स्तनाच्या कर्करोगामुळे मृत्यू झाला होता. स्तनाच्या कर्करोगाने पीडित रुग्णांना मदत करण्यासाठी या सामन्याच्या माध्यमातून निधी उभारला जातो. यावेळी पिंक टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाला प्रतिस्पर्धी म्हणून इंग्लंडचा संघ असणार आहे आणि हा सामना अॅशेस मालिकेचा एक भाग असेल. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांची नवीन वर्षातील पहिली कसोटी ५ जानेवारीपासून सिडनी क्रिकेट मैदानावर (SCG) खेळवली जाणार आहे. एसजीएस कसोटीचा तिसरा दिवस हा जेन मॅकग्रा दिवस म्हणून ओळखला जातो आणि तोपर्यंत ग्लेन मॅकग्राची कोविड चाचणी नकारात्मक येते का, हे पाहावे लागेल. दरम्यान, दोन्ही संघातील खेळाडूंना त्यांच्या 'बॅगी पिंक' कॅप्स दिल्या जातील, तेव्हा मॅकग्रा हा या कार्यक्रमाला व्हर्चुअली हजेरी लावणार आहे. ऑस्ट्रेलियन माध्यमांनी मॅकग्रा फाऊंडेशनच्या मुख्य कार्यकारी होली मास्टर्स यांचा हवाला देऊन म्हटले आहे की, 'ग्लेनची पीसीआर चाचणी झाली आणि दुर्दैवाने निकाल सकारात्मक आला. आम्ही ग्लेन आणि त्याच्या कुटुंबाला उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो.' ती पुढे म्हणाली की, 'आम्ही क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि एससीजीमधील आमच्या भागीदारांचे आभारी आहोत. पिंक टेस्टला पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही इंग्लंड क्रिकेट संघ आणि प्रसारकांचेही आभारी आहोत.'
from Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times https://ift.tt/3sOcFv5
https://ift.tt/3mRJweu
0 Comments