name plate

name plate

क्विंटन डीकॉकने अचानक का घेतली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती, जाणून घ्या हे मोठं कारण...

सेंच्युरियन : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यानंतर क्विंटव डीकॉकने सर्वांनाच मोठा धक्का दिला. आपण आता कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे डीकॉकने अचानक जाहीर केले आणि आणि सर्वांनाच मोठा धक्का बसला. पण आता डीकॉकने अचानक का कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे, हे समोर आले आहे. जाणून घ्या डीकॉकच्या निवृत्तीचे कारण...भारताविरुद्धच्या दुसऱ्या आणि कसोटी सामन्यात आपण खेळणार नसल्याचे डीकॉकने दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळाला मालिका सुरु होण्यापूर्वीच कळवले होते आणि त्यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळाने ही गोष्ट मान्यही केली होती. पण पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव झाला आणि हा पराभव त्यांच्या वाईट फलंदाजीमुळे झाल्याचे समोर आले. पण त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळाने डीकॉकला यापुढील सामन्यातही खेळण्यास सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. पण दुसरीकडे डीकॉकच्या घरी पाळणा हलणार होता आणि त्यासाठीच त्याने सुट्टी मागितली होती. सध्याच्या घडीला आपल्या पत्नीला आपली जास्त गरज आहे, हे डीकॉकने सांगितले होते. पण त्यानंतर जास्त वाद वाढायला नको आणि आपण कुटुंबियांना आता जास्त वेळ द्यायला हवा, या निर्णयापाशी डीकॉक आला व त्याने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. निवृत्ती घेतल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट मंडळ त्याला कसोटी क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी दबाव टाकू शकत नाही. त्यामुळे निवृत्तीचा निर्णय घेत डीकॉकने यावेळी कुटुंबियांना प्राधान्य घेण्याचा निर्णय घेतला, असे सूत्रांनी सांगितले आहे. डीकॉक हा दक्षिण आफ्रिकेचा सर्वात अनुभवी फलंदाज आणि यष्टीरक्षक आहे. त्याचबरोबर भारताची गोलंदाजी कशी आहे, याचा त्याला चांगला अभ्यास आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेच्या संघात अनुभवी फलंदाजांची कमतरता दिसत आहे. त्यामुळे डीकॉक संघात नसणे हा दक्षिण आफ्रिकेसाठी मोठा धक्का असणार आहे. कारण डीकॉकच्या तोडीचा अनुभवी दुसरा खेळाडू सध्याच्या घडीला तरी दक्षिण आफ्रिकेच्या संघात दिसत नाही. त्यामुळे डीकॉक संघात नसताना दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज आता दुसऱ्या कसोटीत किती धावा करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.


from Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times https://ift.tt/34kSpHn
https://ift.tt/3Hr8Tf9

Post a Comment

0 Comments