name plate

name plate

South Africa vs India 2nd Test Live Streaming: भारत विरुद्ध द.आफ्रिका दुसरी कसोटी आजपासून; कधी,कुठे आणि केव्हा पाहाल सामना

जोहान्सबर्ग: बॉक्सिंग डे कसोटीत विजय मिळवलेल्या भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला असून आता सोमवारपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीला सुरूवात होणार आहे. २०२१चा शेवट विजयाने करणाऱ्या भारतीय संघाला आता २०२२ची सुरूवात देखील शानदार करण्याचा प्रयत्न करेल. भारताने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० आघाडी घेतली आहे. दुसऱ्या बाजूला ज्या मैदानावर भारत दुसरी कसोटी खेळणार आहे तेथे गेल्या ३० वर्षात एकदाही टीम इंडियाचा पराभव झालेला नाही. भारताने जोहान्सबर्गमध्ये ५ सामने खेळले आहेत, त्यापैकी २ मध्ये विजय तर ३ कसोटी ड्रॉ झाल्या आहेत. वाचा- दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरी कसोटी कधी खेळवली जाणार आहे? >> दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरी कसोटी सोमवार ३ जानेवारीपासून सुरू होईल दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरी कसोटी कुठे खेळवली जाणार आहे? >> दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरी कसोटी जोहान्सबर्गच्या द वॉन्डरर्स मैदानावर होणार आहे. वाचा- दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरी कसोटी किती वाजता सुरू होणार आहे? >> दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरी कसोटी भारती वेळेनुसार दुपारी १.३० मिनिटांनी सुरू होणार आहे. दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरी कसोटीची नाणेफेक किती वाजता होईल? >> दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरी कसोटीची नाणेफेक दुपारी १ वाजता होईल. वाचा- दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरी कसोटीचे लाईव्ह टेलिकास्ट कुठे पाहता येईल? >> दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरी कसोटीचे लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता. दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरी कसोटीचे लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहू शकता? >> दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरी कसोटी लाइव्ह स्ट्रीमिंग तुम्ही हॉटस्टार आणि सामन्याचा लाइव्ह स्कोअरकार्ड आणि अपडेट्स maharashtratimes.com वर पाहू शकता.


from Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times https://ift.tt/3qMkpex
https://ift.tt/3eKjEwP

Post a Comment

0 Comments