मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री साठी २०२१ हे वर्ष अडचणींनी भरललं होतं. ती अनेक वादात अडकली, तिच्यावर टीकाही झाली. तिच्या वादग्रस्त विधानांमुळे कंगनाच्या ट्विटरवरही बंदी घालण्यात आली होती. अशा परिस्थितीत अभिनेत्रीने नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मकतेने केली. तिरुपती बालाजीजवळील ‘राहू-केतू’ मंदिरात तिने प्रार्थना केली. जिथे कंगनाने देवाला एफआयआर आणि पोलिस तक्रारींपासून लांब ठेवण्यासाठीची प्रार्थना केली आणि या वर्षी जास्तीत जास्त प्रेमपत्रं मिळावीत अशी इच्छाही व्यक्त केली. क्रीम कलरची साडी आणि कपाळावर टिळा लावलेली कंगना मंदिरात देवाच्या भक्तीत तल्लीन झालेली दिसली. यावेळी तिने दिव्यांच्या मध्यभागी बसून पूजा केली आणि गायीला चाराही दिला. कंगनाने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'जगात एकच राहू-केतू मंदिर आहे. जे तिरुपती बालाजीच्या अगदी जवळ आहे. तिथे काही विधी केले.. पाच मौलिक लिंगांपैकी एक वायु (वायु तत्व), लिंडा देखील येथे स्थित आहे. एक अप्रतिम ठिकाण... जय राहू केतू जी.' सर्वांना दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा कंगनाने स्वतःचा एक सुंदर फोटो शेअर केला, ज्यामध्ये ती साडीत दिसत आहे. या पोस्टद्वारे तिने सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नवीन वर्षाची सुरुवात तिरुपती बालाजीच्या दर्शनाने करत असल्याचेही तिने सांगितले. 'भीकेत मिळालं स्वातंत्र्य' विधानावर झालेली टीका कंगना रणौतने १९४७ मध्ये मिळालेल्या स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त विधान केल्यानं तिच्यावर बरीच टीका झाली होती. ती म्हणाली होती की, 'आपल्याला खरं स्वातंत्र्य १९४७ मध्ये नाही तर २०१४ मध्ये मिळालं आहे.' चित्रीकरणात व्यग्र कंगना रणौत सध्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत तिच्या प्रोडक्शन हाऊसचा पहिल्या चित्रपट 'टिकू वेड्स शेरू' च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर याचे काही फोटोही शेअर केले होते. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर दिसणार आहेत.
from Entertainment News in Marathi: Celebrity News and Gossips Online | Maharashtra Times https://ift.tt/32SPHI1
https://ift.tt/3JrLuw1
0 Comments