मुंबई: भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील वनडे मालिकेसाठी काल शनिवारी खेळाडूंची निवड करण्यात आली. निवड समितीचे प्रमुख यांनी या मालिकेसाठी वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मा दुखापतीळे खेळू शकणार नाही, त्याच्या जागी केएल राहुलकडे जबाबदारी दिला जाणार असल्याचे सांगितले. त्याच बरोबर उपकर्णधार म्हणून जसप्रीत बुमराहची निवड करण्यात आली आहे. वाचा- भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १९, २१ आणि २३ जानेवारी रोजी ३ सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. हे सामने पार्ल आणि केपटाइन येथे होतील. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील पाच जणांच्या निवड समितीने भारतीय संघाची निवड केली. यात गेल्या काही काळात आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये धमाकेदार फलंदाजी करणाऱ्या ऋतुराज गायकवाडची देखील निवड करण्यात आली आहे. चेतन शर्मा यांनी ऋतुराजचे कौतुक देखील केले. तो राष्ट्रीय संघात यशस्वी होऊ शकतो असे देखील म्हटले. वाचा- संघाची निवड जाहीर केल्यानंतर पत्रकार परिषदेत जेव्हा त्यांना ऋतुराजबद्दल विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, नक्कीच त्याला योग्य वेळी संधी मिळाली आहे. टी-२० संघात तो खेळला आहे आता वनडे संघात देखील तो खेळणार. निवड समितीला वाटते की ऋतुराज सध्या ज्या पद्धतीने खेळत आहे त्यानुसार त्याला नक्कीच आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत अंतिम ११ मध्ये स्थान मिळेल. वाचा- पुण्याच्या २४ वर्षीय ऋतुराजने २०२१च्या आयपीएलमध्ये सर्वाधिक ६३५ धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्जला विजय मिळून देण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती. चेतन शर्मा यांच्या मते ऋतुराजला त्याच्या चांगल्या कामगिरीचे बक्षिस मिळाले आहे. आम्ही त्याची निवड केली आहे, आता संघ व्यवस्थापन त्याला कधी अंतिम ११ मध्ये स्थान देते हे बघेल. त्याची कधी गरज आहे किंवा संघातील व्यवस्थापन कसे होते.
from Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times https://ift.tt/3qCbiwU
https://ift.tt/3zfSiYJ
0 Comments