मुंबई : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी विराट कोहलीने पत्रकार परिषद घेतल्यानंतर अनेक नवे वाद निर्माण झाले होते. टी-२० चे कर्णधारपद सोडण्याबाबत कोणीही त्याच्याशी बोलले नाही, असे तो म्हणाला होता. त्याच्या या विधानाचे खंडन निवड समितीचे प्रमुख यांनी केले आहे. ते म्हणाले की, टी-२० विश्वचषकापूर्वी कोहलीला टी-२० कर्णधारपदी कायम राहण्यास सांगितले होते. वाचा- विराट कोहलीने टी-२० कर्णधारपद सोडल्यानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष यांनीही सांगितले होते की, बोर्डाने कोहलीला आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितले होते, पण नंतर त्याने गांगुलीच्या विधानाचे खंडन केले होते. कोहली म्हणाला होता की, बोर्ड अध्यक्षांशी याबाबत काहीही बोलणे झाले नव्हते आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी संघ निवडीच्या दीड तास आधी त्याला एकदिवसीय कर्णधारपदावरून हटविण्यात आल्याचे कळविले होते. वाचा- शुक्रवारी एकदिवसीय संघाची घोषणा करताना शर्मा म्हणाले, “बैठक सुरू झाली तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले. टी-२० विश्वचषक सुरू होण्यापूर्वी अशी चर्चा ऐकल्यावर काय प्रतिक्रिया असेल. बैठकीत उपस्थित असलेल्या प्रत्येकाने त्याला टी-२० कर्णधारपदावरून पायउतार होण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यास सांगितले होते. याविषयी विश्वचषकानंतर चर्चा करता येईल.'' शर्मा पुढे म्हणाले की, “त्यावेळी सर्व निवडकर्त्यांना वाटले की, याचा विश्वचषकातील कामगिरीवर परिणाम होऊ शकतो. यासाठी बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांच्यासह बैठकीत उपस्थित असलेल्या सर्वांनी विराटला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार राहण्यास सांगितले होते. निवड समितीचे सदस्य, बोर्डाचे अधिकारी सर्व तिथे होते. सगळेच बोलले होते. टी-२० विश्वचषक जवळ आला होता आणि त्याच्या निर्णयाचा आम्हाला संघावर परिणाम होऊ द्यायचा नव्हता. त्याने निर्णय घेतला आणि आम्ही त्याचा आदर करत, पण आम्ही सर्वांनी त्याला विचार करायला सांगितले होते."
from Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times https://ift.tt/32GO40z
https://ift.tt/3EKHUt9
0 Comments